श्री लाभ इंटरप्राईजेस महिलांच्या हाताला काम… आणि त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा! सन 2017 पासून श्री लाभ इंटरप्राईजेस ही कंपनी कार्यरत आहे. पूजा-अर्चनेमध्ये आवश्यक असणाऱ्या लांब वात, वस्त्र माळ, फुल वात यांसारख्या विविध पूजासाहित्याची Handmade Manufacturing कंपनीकडून केली जाते. ही उत्पादने संपूर्ण भारतातील प्रत्येक घरात आवश्यक असणारी आहेत. विशेषतः सण-उत्सवांच्या काळात या उत्पादनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. याच गरजेतून एक व्यवसायाची संधी निर्माण झाली… आणि ही संधी महाराष्ट्रातील महिलांपर्यंत पोहोचवण्याचे काम श्री लाभ इंटरप्राईजेसने केले. महिलांना घरबसल्या उत्पादने तयार करण्याची संधी देताना, कंपनी महिलांना आवश्यक कच्चा माल उपलब्ध करून देते आणि महिलांनी तयार केलेला संपूर्ण माल कंपनी स्वतः खरेदी करून त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देते. म्हणजेच कच्चा माल कंपनीचा… उत्पादन महिलांचे… आणि तयार मालासाठी बाजारपेठेची जबाबदारीही कंपनीची! यामुळे महिलांना ग्राहक शोधण्याची किंवा माल विक्रीची चिंता न करता, घरबसल्या काम करून उत्पन्न मिळवण्याची संधी मिळते. फक्त उत्पादन निर्मितीपुरतेच मर्यादित न राहता, महिलांना ऑनलाईन प्रोडक्ट सेलिंग, डिजिटल ई-कॉमर्स आणि व्यवसायवृद्धीचे प्रशिक्षण देखील दिले जाते. महिलांना ऑनलाइन माध्यमातून अधिक ग्राहकांपर्यंत कसे पोहोचता येईल, स्वतःचा व्यवसाय कसा वाढवता येईल आणि उत्पन्नाच्या नवीन संधी कशा निर्माण करता येतील, याचे मार्गदर्शन ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिले जाते. आजपर्यंत 5,000 पेक्षा जास्त महिलांना या व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही केवळ एक कंपनी नाही… ही आहे महिलांच्या स्वावलंबनासाठी उभी राहिलेली एक चळवळ! आजही कंपनीचे ध्येय स्पष्ट आहे— ज्या महिलांना व्यवसायाची संधी हवी आहे, ज्यांना स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे, आणि ज्यांना व्यवसायाचे योग्य मार्गदर्शन हवे आहे, अशा हजारो महिलांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे. श्री लाभ इंटरप्राईजेस — महिलांच्या हाताला रोजगार, स्वप्नांना व्यवसायाची दिशा, आणि आत्मनिर्भरतेकडे एक मजबूत पाऊल!
Comment Form